पिंपरी चिंचवड शहरात फळ, भाजी विक्रेत्याचा प्रश्न गंभीर होत आहे .

पिंपरी चिंचवड शहरात फळ, भाजी विक्रेत्याचा प्रश्न गंभीर होत आहे .


फळभाजी विक्रेत्यांना पोषक वातावरण आणि योग्य सहकार्य न केल्यास फळ, भाजी विक्री न करण्याचा विचार 


एच ए ची मोकळी जागा सोशल डिस्टन्स मेंटेन करत उपलब्ध करून देण्याची मागणी.


पिंपरी येथील ४० वर्षांपूर्वीची भाजी मंडई उद्ध्वस्त करण्यात आली असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिनांक १-०४-२०२० आणि २-०४-२०२० रोजी असे सलग दोन दिवस अतिक्रमण पथकाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून या ठिकाणी व्यवसाय करणे फळ ,भाजी विक्रेते टपरी पथारी हातगाडी धारकांवर कारवाई करण्यात आली दिनांक २-०४-२०२० रोजी फ्रुट मार्केट आणि फुल मार्केट धारकांवर कारवाई करून त्यांची निवाऱ्यासाठी तात्पुरते उभे केलेले निवारा उद्ध्वस्त करण्यात आला आहे, देशात कोरोना मुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असून 144 कलम लागू आहे त्यामुळे चार पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमा होण्यास विरोध आहे, संपूर्ण देश कोरनाशी लढत असून देशासमोर मोठे संकट आहे अशा आणि  बाणीच्या परिस्थितीत नागरिकांचा जीव वाचवणे आणि घरात असलेल्या नागरिकांचा जीवन आवश्यक वस्तू पुरवणे हे शासनाचे कर्तव्य आहे,
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 24 तास जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सुरू ठेवा असे सांगितले असताना, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासन मात्र अगदी उलट काम करत असून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या पिंपरी भाजी मंडई येथील फळ, भाजी विक्रेत्यांना सोशल डिस्टन्सच्या नावाखाली विस्थापित करत आहेत,


पिंपरी मंडई येथे सोशल डिस्टन्स नसेल तर त्याबाबत पट्टे  मारून देणे सोशल डिस्टन्स पाळण्यास लावणे याबाबत उपाययोजना करण्याऐवजी ४० वर्ष पूर्वीची जुनी मंडई उध्वस्त करत आहेत हा कोणता न्याय आहे , 


यामुळे फळभाजी विक्री करणाऱ्या व्यवसायिकांना प्रश्न निर्माण झाला असून याबाबत प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य न मिळाल्यास पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व फळ भाजीविक्रेते व्यवसाय बंद ठेवतील अशी भूमिका घ्यावी लागेल, असे या विक्रेत्यांनी सांगितले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना पिंपरी-चिंचवड म.न.पा.च्या वतीने काही व्यक्तींच्या सांगण्यावरून हेतू पुरस्कर अकसाने पूर्वनियोजित कारवाई करण्यात आली आहे, बेकायदेशीर पणे अतिक्रमण कारवाई करणाऱ्या आणि यावेळी पोलीस प्रशासनाचा दुरूपयोग करणाऱ्या संबंधित अधिकारी यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी,


तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी पिंपरी येथील एच ए मैदानात सोशल डिस्टन्स मेंटेन करून तात्पुरती मंडई उभारण्यास परवानगी द्यावी.


या बाबतचे निवेदन मुख्यमंत्री,  गृहमंत्री, नगरविकास मंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे , कारवाई न थांबवल्यास आणि प्रशासनाने सहकार्य न केल्यास पिंपरी-चिंचवड  शहरातील फळ ,भाजी विक्रेते भाजी विक्री करू शकत नाहीत, असे झाल्यास नागरिकांना फळ, भाजी मिळणार नाही आणि या सर्व परिस्थितीस पिंपरी चिंचवड म.न.पा.तील संबंधित अधिकारी जबाबदार असतील असे  संतोष कदम यांनी सांगितले.


    हिंद मजदुर किसान पंचायचे पुणे जिल्हा अध्यक्ष   ( संतोष भाऊ कदम ) यांची मागणी